Skip to content
योहान ७:१४-२४

योहान ७:१४-२४

१४
मग अर्धा सण पार पडल्यानंतर येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि शिकवू लागले.
१५
जे यहूदी तिथे होते ते चकित झाले आणि विचारू लागले, “हा मनुष्य शिकला नसून हे ज्ञान त्याला कसे प्राप्त झाले?”
१६
येशू त्यांना म्हणाले, “माझी शिकवण माझी स्वतःची नसून ज्यांनी मला पाठविले त्यांची आहे.
१७
जर कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करण्याचा निर्धार करेल तर त्याला खात्रीने समजेल की माझी शिकवण परमेश्वरापासून आहे की मी स्वतःच्या मनाचे बोलत आहे.
१८
जो कोणी स्वतःचे विचार मांडतो तो स्वतःचे गौरव करतो, परंतु जो ज्याने त्याला पाठविले त्याला गौरव मिळावे म्हणून बोलतो, तो मनुष्य खरा आहे; व त्याच्यात खोटेपण नाही.
१९
मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले आहे ना? तरी तुम्हापैकी एकही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारण्याचा प्रयत्न का करता?”
२०
त्यावर लोकसमुदायाने उत्तर दिले, “तू भूतग्रस्त आहेस. तुला जिवे मारण्याचा प्रयत्न कोण करीत आहे?”
२१
येशू त्यांना म्हणाले, “मी एक चमत्कार केला आणि तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटले.
२२
मोशेने तुम्हाला सुंतेचा नियम दिला तरी, ही प्रथा मोशेद्वारे आली नसून, पूर्वजांपासून आलेली आहे, त्यानुसार तुम्ही मुलाची सुंता शब्बाथ दिवशी करता.
२३
मोशेच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून मुलाची सुंता जर शब्बाथ दिवशी करता, मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला पूर्ण स्वास्थ्य दिले तर माझ्यावर का रागावता?
२४
तोंड बघून न्याय करू नका, तर यथायोग्य न्याय करा.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options