योहान १७:२२-२४
२२
तुम्ही जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे,
२३
मी त्यांच्यामध्ये व तुम्ही माझ्यामध्ये यासाठी आहोत की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तुम्ही मला पाठविले आहे आणि जशी तुम्ही मजवर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली आहे.
२४
“हे पित्या, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी तुम्ही मजवर प्रीती करून मला गौरव दिले. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून तुम्ही जे लोक मला दिले, त्यांनी जिथे मी आहे, तिथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे.
Settings