योएल ३:१३-१४
१३
आता विळा चालवा, कारण पीक तयार झाले आहे. या, द्राक्षांचा घाणा तुडवा, कारण द्राक्षकुंडे भरली आहेत आणि कुंडे ओसंडून वाहत आहेत— कारण त्यांची दुष्टाई फार मोठी आहे!”
१४
निर्णयाच्या खोर्यात लोकांची गर्दीच गर्दी आहे! कारण निर्णयाच्या खोऱ्यात याहवेहचा दिवस येऊन ठेपला आहे.