Skip to content
योएल २:२३-२६

योएल २:२३-२६

२३
सीयोनच्या लोकांनो, आनंद करा; तुमच्या याहवेहच्या ठायी आनंद करा, कारण त्यांनी शरदॠतूतील पाऊस दिला आहे कारण ते विश्वासयोग्य आहेत. परमेश्वर तुमच्यासाठी विपुल वृष्टी करतात, शरदॠतूतील आणि वसंतॠतूतील भरपूर पाऊस पाहिल्याप्रमाणे दिला आहे.
२४
खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील; आणि कुंडे तेलाने आणि द्राक्षारसाने ओसंडून वाहू लागतील.
२५
“मोठे टोळ व तरुण टोळ इतर टोळ व टोळांचे थवे, म्हणजेच माझे मोठे सैन्य जे मी तुमच्यामध्ये पाठवले होते; त्यांनी खाल्लेल्या तुमच्या वर्षांची मी भरपाई करेन.
२६
जोपर्यंत तुम्ही तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही खाल, ज्यांनी तुमच्यासाठी अद्भुत कार्य केले आहेत त्या याहवेह तुमच्या परमेश्वराच्या नावाची तुम्ही स्तुती कराल, माझे लोक पुन्हा कधीही लज्जित होणार नाहीत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options