योएल १:८-१३
८
जशी एक कुमारी गोणपाट नेसून आपल्या तारुण्यातील प्रियकरासाठी करते, तसा तुम्हीही शोक करा.
९
याहवेहच्या मंदिरात वाहण्याची अन्नार्पणे व पेयार्पणे बंद झाली आहेत; याहवेहसमोर सेवा करणारे याजक विलाप करीत आहे.
१०
शेतांची धूळधाण झाली आहेत, भूमी कोरडी पडली आहे; धान्याचा नाश झाला आहे, नवीन द्राक्षारस सुकला आहे, जैतून तेल समाप्त झाले आहे.
११
अहो, शेतकर्यांनो, लज्जित व्हा, द्राक्षमळ्यांची मशागत करणार्यांनो, आकांत करा; गहू व जव याकरिता विलाप करा, कारण शेतातील पिके नष्ट झाली आहेत.
१२
द्राक्षवेल वाळून गेली आहे अंजिराचे झाड कोमेजले आहे; डाळिंब, खजुराचे आणि सफरचंदाचे झाड; शेतातील सर्व झाडे सुकून गेली आहेत. खचितच लोकांचा आनंद विरून गेला आहे.
१३
अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.
Settings