इय्योब ८:१-७
१
तेव्हा बिल्दद शूहीने उत्तर दिले,
२
“कुठवर अशा गोष्टी तू बोलत राहशील? सोसाट्याच्या वार्यासारखे तुझे शब्द आहेत.
३
परमेश्वर न्याय विपरीत करतात काय? सर्वसमर्थ जे योग्य आहे त्याचा विपर्यास करतात काय?
४
जेव्हा तुझ्या मुलांनी त्यांच्याविरुद्ध पाप केले, म्हणून परमेश्वराने त्यांच्या पापाची त्यांना शिक्षा केली.
५
परंतु जर तू मनःपूर्वक परमेश्वराला शोधशील आणि सर्वसमर्थाकडे विनवणी करशील,
६
जर तू शुद्ध व सरळ आहेस, आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील आणि तुला तुझ्या समृध्दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील.
७
तुझा प्रारंभ लीन असला, तरी तुझे भावी आयुष्य समृद्धीचे होईल.
Settings