इय्योब ४:३-६
३
तू अनेक जणांना कसे शिकवलेस, तू दुर्बल हात कशाप्रकारे सबळ केलेत याचा विचार कर.
४
तुझ्या शब्दांनी अडखळलेल्यांना आधार दिला आहे; आणि लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेस.
५
परंतु आता तुझ्यावर संकट आले आणि तू निराश झालास; तुझ्यावर आघात झाला आणि तू भयभीत झालास.
६
तुझी भक्ती हा तुझा आत्मविश्वास नसावा काय आणि तुझे निर्दोष मार्ग तुझी आशा असू नयेत काय?
Settings