इय्योब ३९:१९-२२
१९
“घोड्याला त्याचे बळ तू देतोस काय अथवा त्याच्या मानेवर आयाळ तू पांघरलेस काय?
२०
टोळाप्रमाणे त्याला तू उड्या मारण्यास लावतोस काय? जे त्यांच्या गर्विष्ठपणात आतंक व्यक्त करतात?
२१
ते यांच्या भयंकर पंजाने ओरखडत आपल्या बळात उल्हास करतो, आणि शत्रूशी सामना करण्यासाठी धावून येतो.
२२
तो भयास हसतो आणि कशालाही घाबरत नाही; तलवारीपासून तो मागे हटत नाही.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.