इय्योब ३८:१२
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १२ दाखवत आहे.
९
जेव्हा मी ढगांसाठी वस्त्र बनविली आणि त्यांना दाट अंधकारात लपेटले,
१०
जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या आणि त्यांची दारे आणि गजे त्यांच्या ठिकाणी लावून दिली,
११
जेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही येथवरच यावे आणि यापलीकडे नाही; तुझ्या उन्मत्त लाटा येथेच थांबतील’?
१२
“तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का, किंवा कधी प्रभातेला त्याचे ठिकाण दाखविले आहे,
१३
यासाठी की ते पृथ्वीच्या टोकांना पकडतील आणि दुष्टांना त्यातून झटकून टाकतील?
१४
जशी शिक्क्याच्या खाली ओली माती, तशी पृथ्वी आकार घेते; आणि वस्त्रासारखी त्याची मुद्रा उठून दिसते.
१५
दुष्टांपासून त्यांचा प्रकाश मागे रोखला जातो, आणि त्यांचा उगारलेला हात मोडला जातो.
Settings