इय्योब ३४:३१-३७
३१
“समजा कोणी परमेश्वराला म्हटले, ‘मी पापी आहे, परंतु मी यापुढे पाप करणार नाही.
३२
मी पाहू शकत नाही ते मला शिकवा; मी जर अपराध केला आहे, तर मी तो पुन्हा करणार नाही.’
३३
जेव्हा तुम्ही पश्चात्ताप करण्याचे नाकारता तरी परमेश्वराने तुमच्या अटींनुसार न्याय द्यावा काय? मी नाही तर तुम्हीच ते ठरविले पाहिजे; म्हणून तुम्हाला काय माहीत आहे ते मला सांगा.
३४
“बुद्धिमान मनुष्य जाहीर करतात, ज्ञानी लोक जे माझे बोलणे ऐकतात ते म्हणतात,
३५
‘इय्योब अज्ञानाने बोलत आहे; त्याच्या बोलण्यात सुज्ञता नाही.’
३६
त्या इय्योबाची पूर्णपणे पारख केली जावी कारण तो दुष्टांप्रमाणे बोलत आहे!
३७
कारण तो आपल्या पापात बंडाची भर घालतो; आमच्यामध्ये तिरस्काराने हातांनी टाळ्या वाजवितो आणि परमेश्वराविरुद्ध आपले शब्द वाढवितो.”
Settings