Skip to content
इय्योब ३४:२१-२७

इय्योब ३४:२१-२७

२१
“मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत; परमेश्वराचे त्यांच्या प्रत्येक पावलांवर लक्ष आहे.
२२
कोणतीही दाट छाया ना गडद अंधकार आहे, जिथे दुष्कर्मी लपू शकतील.
२३
लोकांची पुढे अजून परीक्षा करावी अशी परमेश्वराला गरज नाही, जेणेकरून त्यांनी न्यायासाठी त्यांच्यासमोर यावे.
२४
चौकशी न करताच ते बलवानांना छिन्नभिन्न करतात आणि त्यांच्या स्थानी दुसर्‍यास स्थापितात.
२५
कारण त्यांच्या प्रत्येक कृत्यांची ते नोंद घेतात, रात्रीच्या वेळी ते दुष्टाला उलथून टाकतात आणि ते तुडविले जातात.
२६
आणि सर्व लोक पाहू शकतील अशी शिक्षा त्यांच्या दुष्टपणामुळे परमेश्वर त्यांना करतात,
२७
कारण परमेश्वराचे अनुसरण करण्यापासून ते फिरले आहेत आणि त्यांच्या कोणत्याही मार्गाविषयी दुष्टाला आदर नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options