मुख्य मजकुरावर जा
इय्योब ३३:१२-१८

देवाचा न्याय व संवाद

इय्योब ३३:१२-१८
१२
“परंतु मी तुला सांगतो, याबाबतीत तू चुकतोस, कारण परमेश्वर कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.
१३
तू त्यांच्याविरुद्ध तक्रार का करतोस की ते कोणाच्याही शब्दास प्रतिसाद देत नाही?
१४
कारण परमेश्वर एकदा एका, मग दुसर्‍या मार्गाने मानवांशी बोलत असतात— जरी कोणाला त्याचे अवलोकन होत नाही.
१५
रात्रीच्या स्वप्नात, दृष्टान्तामध्ये, जेव्हा लोकांना गाढ झोप लागलेली असते त्यांच्या बिछान्यावर डुलक्या घेत असताना,
१६
परमेश्वर त्यांच्या कानात बोलून आणि चेतावणी देऊन त्यांना घाबरवितात,
१७
म्हणजे ते मनुष्याच्या चुकीच्या वर्तनापासून फिरतील आणि अहंकारापासून दूर राहतील,
१८
खड्ड्यात पडण्यापासून आणि तलवारीने त्यांचे जीवन नष्ट होण्यापासून त्यांना राखतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options