इय्योब २७:७-१०
७
“माझे शत्रू दुष्टांप्रमाणे, आणि माझे विरोधी अन्यायीप्रमाणे होवोत!
८
कारण परमेश्वराने जर देवहीनाला छेदून टाकले, आणि त्याचा प्राण घेतला तर त्यांना काय आशा आहे?
९
जेव्हा त्यांच्यावर संकट येईल, तेव्हा परमेश्वर त्यांची आरोळी ऐकेल काय?
१०
सर्वसमर्थामध्ये त्यांना संतोष मिळणार काय? सर्वदा ते परमेश्वराचा धावा करतील काय?
Settings