Skip to content
इय्योब २:९

इय्योब २:९

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
त्यावर याहवेहने सैतानाला म्हटले, “ठीक आहे, तो तुझ्या हातात आहे; मात्र तू त्याचा जीव वाचू दे.”
मग सैतान याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि त्याने इय्योबाला तळपायापासून त्याच्या डोक्यापर्यंत वेदनादायक गळवांनी पीडले,
तेव्हा इय्योबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी एक फुटलेली खापर घेतली आणि तो राखेमध्ये जाऊन बसला.
तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, “तुम्ही अजूनही सत्याला धरून आहात काय? परमेश्वराला शाप द्या आणि मरून जा!”
१०
यावर इय्योब म्हणाला, “तू एखाद्या मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही.
११
जेव्हा इय्योबाचे तीन मित्र एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी इय्योबावर आलेल्या संकटांविषयी ऐकले, ते आपआपल्या घरून निघाले; इय्योबाकडे आपण मिळून जावे व त्याला सहानुभूती दाखवून त्याचे सांत्वन करावे असे त्यांनी एकमताने ठरविले.
१२
त्यांनी इय्योबाला दुरून पाहिले, तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाहीत; मग ते मोठ्याने रडू लागले, त्यांनी आपले झगे फाडले आणि आपल्या डोक्यावर धूळ घातली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options