यिर्मयाह ५२:४-७
४
म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्यांनी त्यांच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले.
५
सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता.
६
चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.
७
तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सर्व सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही ते रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून ते अराबाह च्या दिशेने पळून गेले.
Settings