Skip to content
यिर्मयाह ५१:३४-४४

यिर्मयाह ५१:३४-४४

३४
“बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने आम्हाला गिळंकृत केले आहे, त्याने आम्हाला निराशेत ढकलले आहे, त्याने आम्हाला रिक्त भांड्यासारखे केले आहे. सर्पासारखे त्याने आम्हाला गिळले आहे. आणि आमच्या मिष्टान्नाने स्वतःचे पोट भरले आहे, आणि मग आम्हाला बाहेर थुंकून दिले आहे.
३५
सीयोनचे रहिवासी म्हणतात, आमच्या संतानांवर जसा अत्याचार केला, तसा बाबेलवर येवो,” यरुशलेम म्हणते, “आमचे रक्त सांडल्याचा सर्व दोष बाबेल्यांवर पडो.”
३६
म्हणून याहवेह असे म्हणतात: “मी तुमची बाजू मांडेन मी तुमचा सूड उगवेन; मी तिचे समुद्र आटवून टाकेन आणि तिचे झरे शुष्क करेन.
३७
बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण.
३८
तिचे सर्व लोक तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील, सिंहाच्या छाव्यासारखे डरकाळ्या मारतील.
३९
पण ते जेव्हा जागृत होतील, मी त्यांच्यासाठी मेजवानी सिद्ध करेन त्यांना मद्यधुंद करेन, म्हणजे ते किंकाळ्या मारून हसतील—मग ते कायमचे झोपतील मग ते चिरनिद्रा घेतील व उठणार नाहीत.” असे याहवेह जाहीर करतात.
४०
मी त्यांना कोकरागत, मेंढ्या व बोकडागत कत्तल करण्यास खाली आणेन.
४१
“शेशाक कसे हस्तगत केल्या जाईल, संपूर्ण पृथ्वीचे अभिमान पात्र जप्त केल्या जाईल! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड होईल!
४२
बाबेलवर सागर उसळून येईल; सागरलाटांनी ती भूमी झाकून जाईल.
४३
तिची शहरे ओसाड होतील, ती एक शुष्क व निर्जन भूमी होईल, एक अशी भूमी जिथे कोणी मनुष्य राहत नाही, जिच्यामधून कोणीही प्रवास करीत नाही.
४४
मी बेलला बाबिलोन मध्येच शिक्षा देईन आणि त्याने जे गिळले ते मी त्याला थुंकावयास लावेन. यापुढे राष्ट्रे त्याच्याकडे जमावाने येणार नाहीत. बाबेलची तटबंदी कोसळून पडेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options