यिर्मयाह ४८:७-१३
७
कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.
८
विनाशक प्रत्येक नगराविरुद्ध येईल, एकाही नगराची त्याच्या हातून सुटका होणार नाही. दर्याखोर्यांचा नाश होईल, आणि पठारे उद्ध्वस्त होतील, कारण याहवेहने तसे म्हटले आहे.
९
मोआबावर मीठ टाका कारण तिचा उकिरडा बनेल; तिची नगरे उजाड़ होतील, तिथे कोणीही वसती करणार नाही.
१०
“याहवेहने सोपविलेले कार्य आळशीपणाने करणारा शापित असो! रक्तपात न करता तलवार म्यानात ठेवणारे शापित असो!
११
“अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— ती बंदिवासात गेलेली नाही. म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, आणि तिचा सुवासही बदललेला नाही.
१२
परंतु याहवेह म्हणतात, लवकरच असे दिवस येत आहेत, मी तिला बुधल्यातून ओतणारी माणसे पाठवेन, ते तिला या पात्रातून ओतून बाहेर टाकतील; ते तिचे बुधले रिकामी करतील व नंतर तिची पात्रे फोडून टाकतील.
१३
इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल,
Settings