Lompat ke konten
यिर्मयाह ३१:१-९

यिर्मयाह ३१:१-९

याहवेह जाहीर करतात, “त्याकाळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा परमेश्वर असेन व ते माझे लोक असतील.”
याहवेह जे म्हणतात ते असे: “जे तलवारीच्या प्रहारातून वाचले त्यांना रानात अनुकूलता सापडेल इस्राएलला विश्रांती देण्यासाठी मी स्वतः येईन.”
कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले: “मी सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावर प्रीती केली आहे; मी अविनाशी प्रेमदयेने तुम्हाला माझ्याकडे ओढून घेतले आहे.
मी तुला पुन्हा उभारेन, आणि तू, इस्राएली कुमारिके, पुनर्वसित होशील. तू पुन्हा तुझे खंजीर घेशील आणि बाहेर जाऊन आनंदाने नृत्य करशील.
शोमरोनच्या डोंगरावर तू पुन्हा आपले द्राक्षमळे लावशील; शेतकरी ते मळे लावतील व स्वतःची फळे खाण्याचा आनंद उपभोगतील.
‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ, आपले परमेश्वर याहवेहकडे, जाऊ या.’ ” पहारेकरी एफ्राईमच्या टेकड्यांवरून अशी आरोळी मारण्याचा दिवस येत आहे,
याहवेह असे म्हणतात: “याकोबासाठी हर्षाने गाणी गा; सर्वश्रेष्ठ इस्राएली राष्ट्रासाठी गर्जना करा. तुमचे स्तुतिगान जाहीरपणे ऐकू यावे आणि म्हणा, ‘याहवेह, आपल्या लोकांचे, इस्राएलाच्या अवशेषाचे तारण करा’
पाहा, मी त्यांना उत्तरेकडील देशातून आणेन आणि पृथ्वीच्या दिगंतापासून गोळा करेन. त्यांच्यात आंधळे व पांगळे, गर्भवती स्त्रिया, प्रसूती वेदना लागलेल्या माता असतील; फार मोठा समुदाय परत येईल.
ते आनंदाश्रू ढाळतील. मी त्यांना परत आणतांना ते प्रार्थना करतील. मी त्यांना जलप्रवाहाच्या बाजूने चालवेन समतल भूमीवरून ते न अडखळता चालतील, कारण मी इस्राएलचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा ज्येष्ठपुत्र आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options