यिर्मयाह ३:१-११
१
“जर एखाद्या पुरुषाने आपल्या स्त्रीला घटस्फोट दिला आणि त्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले, तर तिच्या पहिल्या पतीकडे तिच्याकडे परत जावे काय? असे करण्याने ही भूमी पूर्णपणे भ्रष्ट होणार नाही काय? परंतु तू एका वेश्येप्रमाणे अनेक प्रियकरांसह राहिलीस— तू माझ्याकडे आता परत येणार का?” असे याहवेह म्हणतात.
२
“उजाड टेकडीकडे आपली दृष्टी कर व पाहा. असे कोणते स्थान आहे जिथे तुझ्यासह कुकर्म केले गेले नाही? रस्त्याच्या कडेला तू आपल्या प्रियकरांची वाट बघतेस, एखाद्या अरबीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीसारखी बसून राहतेस. आपल्या कुकर्माने व जारकर्माने तू सर्व भूमी दूषित केली आहेस.
३
यास्तव वृष्टी होण्याची थांबली आहे. वसंतॠतूतील पाऊस देखील पडला नाही, तू एका लज्जाहीन वेश्येसारखी दिसतेस, पण तू शरमिंदी होण्यास नकार देते.
४
तू मला आताच म्हणालीस ना, ‘माझ्या पित्या, माझ्या तारुण्यातील मित्रा,
५
तू नेहमीसाठी रागावला आहेस का? हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’ याप्रकारे तू बोलतेस, परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.”
६
योशीयाह राजाच्या शासनकाळात, याहवेहने मला म्हटले, “तुम्ही पहिले का अविश्वासू इस्राएलने काय केले आहे? एखाद्या दुराचारी स्त्रीप्रमाणे प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली व्यभिचार करते.
७
मला वाटले हे सर्वकाही झाल्यानंतर ती माझ्याकडे परत येईल, परंतु ती माझ्याकडे परत आलीच नाही आणि हा बंडखोरपणा तिच्या विश्वासघातकी बहिणीने, यहूदीया हिने पाहिला.
८
मी अविश्वासू इस्राएलला तिच्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र दिले आणि तिच्या सर्व व्यभिचारामुळे तिला पाठवले. तरीही मी पाहिले की तिची अविश्वासू बहीण यहूदाहला मुळीच भय वाटले नाही. तीही बाहेर गेली व तिने व्यभिचार केला.
९
कारण इस्राएलच्या दृष्टीत हा व्यभिचार अल्पमात्र होता, तिने सर्व भूमीला भ्रष्ट केले आहे आणि लाकडांच्या व दगडांच्या मूर्तींशी व्यभिचार केला आहे.
१०
हे सगळे घडून सुद्धा तिची अविश्वासू बहीण, यहूदीया, तिच्या संपूर्ण हृदयाने माझ्याकडे परतली नाही, परंतु तिच्यात खोटेपणाच दिसला,” असे याहवेह म्हणतात.
११
याहवेहने मला म्हटले, “विश्वासघातकी यहूदीयापेक्षा विश्वासहीन इस्राएल अधिक नीतिमान आहे.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings