Skip to content
यिर्मयाह २९:२४-२८

यिर्मयाह २९:२४-२८

२४
नेहेलामी शमायाह याला सांग,
२५
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तू स्वतःच्या नावाने मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक याला, इतर सर्व याजकांना व यरुशलेममधील प्रत्येकाला पत्रे लिहिली आहेस. तू सफन्याहला असे म्हटले,
२६
‘यहोयादाच्या जागेवर याजक म्हणून याहवेहने तुला नेमले आहे; म्हणून एखादा वेडा मनुष्य स्वतःला संदेष्टा म्हणवू लागला, तर त्याला खोड्यात घालून लोखंडी गळपट्टा घालण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे.
२७
मग तू या अनाथोथच्या यिर्मयाहला का फटकारले नाहीस, जो स्वतःला संदेष्टा म्हणवितो?
२८
कारण त्याने आम्हाला येथे बाबेलमध्ये हा संदेश पाठविला आहे: आमचा बंदिवास दीर्घकाळचा आहे. आम्ही येथे पक्की खरे बांधून वसती करावी; मळा लावावा व त्यातील उत्पादन खावे.’ ”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.