मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह १९:३-९

अपरिवर्तनीय न्यायाचा घोष

यिर्मयाह १९:३-९
आणि म्हण, अहो यहूदीयाच्या राजांनो, आणि यरुशलेमच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका! सर्वसमर्थ याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: या स्थानावर मी असे भयंकर अरिष्ट आणेन की त्याविषयी जे ऐकतील त्यांचे कान भणभणतील.
कारण त्यांनी मला सोडले आहे आणि हे स्थान त्यांनी परक्या दैवताचे केले आहे; हे लोक अन्य दैवतांपुढे धूप जाळतात, जे त्यांच्या पूर्वजांना किंवा यहूदीयाच्या राजांना कधीही माहीत नव्हते, आणि त्यांनी ही जागा निर्दोष रक्ताने भरून टाकली आहे.
त्यांनी बआल दैवतासाठी होमार्पण म्हणून वेद्या बांधल्या आहेत आणि त्यावर ते आपल्या मुलांचा होम करतात—असे करण्याची मी त्यांना कधी आज्ञा दिली नव्हती किंवा कधी उल्लेखही केला नव्हता, अथवा विचारही केला नव्हता.
याहवेह म्हणाले, पाहा, असे दिवस येत आहेत, तेव्हा या खोर्‍याला ‘तोफेत’ किंवा ‘बेन-हिन्नोमचे खोरे’ असे म्हणणार नाहीत, तर ‘कत्तलीचे खोरे’ असे म्हणतील.
“ ‘या ठिकाणी यहूदीया व यरुशलेम यांच्या योजना मी उधळून लावेन. मी त्यांच्या शत्रूच्या समक्ष तलवारीने त्यांचा वध करेन, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात, आणि मी त्यांची प्रेते पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना खावयास देईन.
मी या नगराचा नाश करेन आणि ते दहशतीचे व आणि घृणेचे ठिकाण बनवीन; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.
मी त्यांना त्यांच्या पुत्र आणि कन्यांचे मांस खाण्यास लावेन, आणि त्यांचे शत्रू त्यांच्या सभोवतीच्या वेढ्याने त्यांच्यावर एवढा दबाव आणतील की ते एक दुसऱ्याचे मांस खातील.’
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options