Skip to content
यिर्मयाह १८:१८-२३

कटकारस्थान आणि यिर्मयाची शापवाणी

यिर्मयाह १८:१८-२३
१८
त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”
१९
“हे याहवेह, माझे ऐका, माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे काय म्हणतात ते ऐका!
२०
चांगल्याची वाईटाने भरपाई करावी का? माझा जीव घेण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे. आठवण ठेवा की मी आपल्यासमोर उभा राहिलो आणि त्यांच्यावतीने बोललो जेणेकरून तुमचा क्रोध त्यांच्यापासून दूर व्हावा.
२१
म्हणून त्यांच्या मुलांना दुष्काळामध्ये जाऊ द्या; त्यांना तलवारीच्या बलाच्या स्वाधीन करा. त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होऊ द्या; त्यांचे पुरुष मृत्यू पावोत, व त्यांचे तरुण लढाईत तलवारीने मारले जावोत.
२२
जेव्हा स्वारी करणारे त्यांच्यावर अचानक हल्ला करतील तेव्हा त्यांच्या घरातून आक्रोश व किंचाळ्या ऐकू येवोत, कारण मला पकडावे म्हणून त्यांनी खड्डा खणला आहे आणि माझ्या वाटेवर त्यांनी गुप्त सापळे लावले आहेत.
२३
परंतु याहवेह, मला मारण्याच्या त्यांच्या सर्व युक्त्या तुम्ही जाणता. त्यांच्या अपराधांची क्षमा करू नका, किंवा त्यांचे पाप दृष्टीपुढून पुसून जाऊ नये. ते तुमच्यापुढे उलटून पडोत; तुम्ही आपल्या क्रोधाच्या वेळी त्यांचा समाचार घ्या.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options