Skip to content
यिर्मयाह १६:२-११

यिर्मयाह १६:२-११

२
“तू येथे विवाह करू नये व तुला येथे मुलेही होऊ नयेत.”
३
कारण ज्यांना या भूमीवर पुत्र आणि कन्या झाले आहेत आणि ज्या स्त्रिया त्यांच्या आई आणि जे पुरुष त्यांचे वडील झाले त्यांच्याबद्दल याहवेह असे म्हणतात:
४
“ते भयानक रोगांना बळी पळून मरतील. त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही, की त्यांना मूठमाती देणार नाही, तर त्यांची प्रेते जमिनीवर शेणासारखे पडून राहतील. तलवार व दुष्काळ यांनी त्यांचा अंत होईल आणि त्यांची प्रेते पक्षी आणि हिंस्र श्वापदे यांचे खाद्य होतील.”
५
कारण याहवेह असे म्हणतात: “ज्या घरात मयतीचे भोजन होत आहे तिथे प्रवेश करू नको; शोक करू नको किंवा सांत्वना देऊ नको, कारण मी माझे आशीर्वाद, माझे प्रेम आणि माझी दया या लोकांपासून काढून घेतली आहेत.” याहवेहची ही घोषणा आहे,
६
“या राष्ट्रातील थोर आणि लहान सर्व मरतील. त्यांना मूठमाती मिळणार नाही, कोणी त्यांच्यासाठी शोक करणार नाही. प्रथेप्रमाणे दुःखाचे चिन्ह म्हणून ते स्वतःच्या शरीरास दुखापत करणार नाहीत किंवा डोक्याचे मुंडण करणार नाहीत.
७
शोक करणार्‍यांना अन्न देऊन कोणी त्यांचे—त्यांच्या आई वा वडिलांच्या मृत्यूबद्दल—समाधान करणार नाही. सांत्वन करण्यासाठी कोणी त्यांना प्यालाभर द्राक्षारसही देणार नाही.
८
“ज्या घरात मेजवानी होत आहे, त्या घरात तू प्रवेश करू नकोस व त्यांच्याबरोबर खाण्यापिण्या करिता बसू नकोस.
९
कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘त्या दिवसामध्ये तुमच्या डोळ्यादेखत या ठिकाणी मी त्यांच्या हर्ष व आनंद गीतांचा, वर आणि वधूंच्या आवाजाचा शेवट करेन.’
१०
“हे सर्व तू लोकांना सांगशील, तेव्हा ते विचारतील, ‘याहवेहने ही भयानक संकटे आमच्यावर पाठविण्याचा हुकूम का दिला आहे? आम्ही कोणती चूक केली आहे? आमच्या याहवेह परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही असे कोणते पाप केले आहे?’
११
तेव्हा त्यांना सांग, याहवेह असे म्हणाले, ‘कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडले. त्यांनी इतर दैवतांची उपासना केली, त्यांची सेवा केली आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options