मुख्य मजकुरावर जा
यिर्मयाह १२:१४-१७

शेजारी राष्ट्रांचा न्याय व पुनर्स्थापना

यिर्मयाह १२:१४-१७
१४
म्हणून याहवेह असे म्हणतात: “माझ्या सर्व दुष्ट शेजाऱ्यांनी, मी माझ्या इस्राएली लोकांना जो देश वतन म्हणून दिला, तो बळकावला. त्यांना मी त्यांच्या भूमीतून उखडून टाकेन आणि मी यहूदीयाच्या लोकांना त्यांच्यामधून घालवून देईन.
१५
परंतु त्यांना घालवून दिल्यानंतर मी पुन्हा सर्वांवर करुणा करेन आणि तुमच्यातील प्रत्येक मनुष्याला परत तुमच्या वतनात, तुमच्या देशात आणेन.
१६
आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील.
१७
परंतु माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार्‍या राष्ट्राला मी पूर्णपणे मुळासकट उपटून टाकेन व नष्ट करेन,” असे याहवेह जाहीर करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options