Skip to content
यिर्मयाह ११:१-८

यिर्मयाह ११:१-८

याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:
“या कराराच्या ठराविक अटी ऐकून घे व यहूदीयाचे लोक व यरुशलेममध्ये राहणारे लोक, यांना त्या सांग.
त्यांना सांग मी इस्राएलचा परमेश्वर याहवेह असे म्हणतो: या कराराच्या अटींचे पालन न करणारा मनुष्य शापित आहे—
‘इजिप्तच्या गुलामगिरीतून, लोखंडी भट्टीतून मी त्यांना सोडवून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना हे नियम सांगितले होते.’ मी म्हटले ‘माझ्या आज्ञा व मी जे सुचविले ते पालन करा, आणि मग तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन.
तेव्हा मी तुमच्या पूर्वजांना वाहलेली शपथ पूर्ण करेन, आणि दूध व मध वाहणारा देश’ ज्यात आज तुम्ही राहत आहात तो मी तुम्हाला देईन.” मी उत्तर दिले, “याहवेह, आमेन.”
नंतर याहवेहने मला म्हटले, “यहूदीयाच्या प्रत्येक नगरात व यरुशलेमच्या रस्त्यातून जा व हा संदेश घोषित कर: ‘कराराच्या अटी ऐकून घ्या व त्यांचे पालन करा.
कारण तुमच्या पूर्वजांना मी इजिप्तमधून बाहेर आणले तेव्हापासून मी त्यांना पुन्हापुन्हा बजावून सांगितले होत, “तुम्ही माझी आज्ञा पाळा.”
परंतु त्यांनी ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट प्रत्येकजण आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने करीत राहिला. परंतु माझ्या ज्या आज्ञा पाळण्यास त्यांना सांगितले होते ते नाकारले म्हणून करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व श्राप मी त्यांच्यावर आणले.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options