Skip to content
यिर्मयाह ११:१८-२०

यिर्मया आपल्याविरुद्धच्या कटाबद्दल विलाप करतो

यिर्मयाह ११:१८-२०
१८
याहवेहने त्यांचे सर्व कारस्थान मला सांगितले, म्हणून ज्यावेळी त्यांनी ते काय करीत आहेत हे मला दाखविले, मला ते आधीच कळले होते.
१९
कत्तलखान्याकडे चालविलेल्या अज्ञान कोकरासारखा मी भोळाभाबडा होतो; मलाच ठार मारण्याचा त्यांचा बेत होता याची मला जाणीवही नव्हती, ते म्हणाले, “झाडाचा त्याच्या फळांसहित नाश करू या; याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू या, म्हणजे याची नावनिशाणीही राहणार नाही.”
२०
सर्वसमर्थ याहवेह, तुम्ही नीतिमत्तेने न्याय करता मन व अंतःकरणाची परीक्षा घेता, त्यांच्यावरील तुम्ही घेतलेला सूड मला स्वतःच्या नजरेने बघू द्या, कारण माझ्या समस्या मी तुमच्याकडे सोपविल्या आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options