Skip to content
यशायाह ६६:१०-१२

यशायाह ६६:१०-१२

१०
“यरुशलेमवर प्रीती करणार्‍यांनो, तिच्याबरोबर हर्ष करा व तिच्यासाठी आनंद साजरा करा; तिच्यासाठी शोक करणार्‍या सर्व लोकांनो, तिच्याबरोबर मोठा उल्हास करा.
११
कारण तिच्या सांत्वन करणाऱ्या स्तनाने तुमचे संगोपन होऊन तुम्ही तृप्त व्हाल; तान्हेबाळ मनमुरादपणे मातेचे स्तनपान करते, तसे तुम्हीही तिच्या ओसंडून वाहणाऱ्या विपुलतेत आनंद कराल.”
१२
कारण याहवेह असे म्हणतात: “मी तिच्या शांततेस नदीप्रमाणे वाढवेन, आणि राष्ट्रांची समृद्धी ओसंडून वाहणाऱ्या झऱ्यांसारखी करेन; तुमचे संगोपन होईल व तुम्ही तिच्या कडेवर बसून फिराल, आणि तिच्या मांडीवर जोजवले जाल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options