मुख्य मजकुरावर जा
यशायाह ६६:१-४

देव ढोंगी उपासना नाकारतो

यशायाह ६६:१-४
याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?
माझ्या हाताने हे सर्व घडवले आणि म्हणून ते अस्तित्वात आले नाहीत काय?” अशी याहवेह घोषणा करतात. “ज्यांच्यावर मी प्रसन्न होतो ते असे असतात: जे लीन व भग्न आत्म्याचे आहेत, आणि जे माझ्या वचनांनी कंपित होतात.
परंतु जो वेदीवर बैल अर्पण करतो, त्याने ते अर्पण नरबली देण्यासारखेच असते, जो कोणी वेदीवर कोकर्‍याचे होमार्पण करतो तो अशा व्यक्तीसारखा आहे, जो कुत्र्याची मान मोडतो; जो कोणी अन्नार्पण करतो, तो डुकराचे रक्त अर्पण करणाऱ्यासारखा आहे, आणि जो कोणी स्मरणार्थ धूप जाळतो तो एखाद्या मूर्तिपूजकासारखा आहे. त्यांनी आपले मार्ग निवडले आहेत, ते त्यांच्या घृणास्पद गोष्टी करण्यामध्ये धन्यता मानतात;
म्हणून मी देखील त्यांच्यासाठी कठोर शिक्षा निवडणार आहे ज्याची त्यांना धास्ती वाटते, तेच मी त्यांच्यावर पाठवेन. कारण मी जेव्हा त्यांना हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर दिले नाही, मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा कोणीही माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्यासमक्ष दुष्कृत्ये केली आणि मला वीट आणणार्‍या गोष्टी करणे निवडले.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options