Skip to content
यशायाह ५८:११-१४

यशायाह ५८:११-१४

११
याहवेह तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील; सूर्याच्या उष्णतेने शुष्क भूमीत राहूनही ते तुमच्या गरजा भागवतील व तुमच्या हाडांना बळकट करतील. मग तुम्ही भरपूर पाणी पाजलेल्या बागेप्रमाणे, कधीही पाणी न आटणाऱ्या झर्‍याप्रमाणे व्हाल.
१२
तुमचे लोक पुरातन भग्नावशेषांची पुनर्बांधणी करतील आणि प्राचीन पाये पुन्हा उभारतील; भग्न झालेली तटबंदी दुरुस्त करणारे, बांधकाम व रस्ते पूर्वस्थितीत आणणारे असे तुम्ही म्हणविले जाल.
१३
“जर तुम्ही शब्बाथदिन अशुद्ध करण्यापासून तुमची पावले दूर ठेवाल आणि माझ्या पवित्र दिवशी आपलीच मनमानी करणे सोडून द्याल, जर तुम्ही शब्बाथदिनास आनंदाचा दिवस मानाल आणि तो याहवेहचा पवित्र दिवस आहे म्हणून त्याचा सन्मान कराल, आणि त्या दिवसाचा आदर करून स्वतःच्या इच्छा बाजूला साराल आणि मनमानेल असे न वागता व निरर्थक गोष्टींची चर्चा करणार नाही,
१४
तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल, आणि मी तुम्हाला या भूतलाच्या उच्चस्थानी विजयाने चालवेन आणि तुमचा पिता याकोबाच्या वतनातील उपजावर मेजवानी देईन.” ही याहवेहच्या मुखातील वचने आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options