Skip to content
यशायाह ४१:२१-२७

यशायाह ४१:२१-२७

२१
“तुमचा वाद पुढे आणा,” असे याहवेह म्हणतात. “तुमचा विवाद पुढे चालवा” असे याकोबाचा राजा म्हणतो.
२२
“हे मूर्तींनो, आम्हाला सांगा, भावी काळात काय घडणार आहे. आम्हाला सांगा, गतकाळात कोणत्या घटना घडल्या, म्हणजे आम्ही त्याबद्दल विचार करू आणि त्यांचा परिणाम आम्हाला कळेल. किंवा पुढे होणाऱ्या घटना तरी सांगा,
२३
भविष्यात काय घडणार ते सांगा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही देव आहात. काही तरी करा, चांगले वा वाईट, म्हणजे आम्ही भयभीत होऊ व घाबरून जाऊ.
२४
परंतु तुम्ही शून्यते पेक्षाही कमी आहात आणि तुमची कामे पूर्णपणे व्यर्थ आहेत; जो कोणी तुमची निवड करतो, तो धिक्कार-योग्य आहे.
२५
“मी उत्तरेकडून एकाला चिथविले आहे आणि तो येत आहे— एक जो सूर्योदयाकडून येतो आणि माझ्या नावाचा धावा करतो. तो राज्यकर्त्यांना तुडवेल, जणू ते बांधकामाचा चुना आहेत, जणू तो माती तुडविणारा कुंभार आहे.
२६
हे घडेल असे प्रांरभापासून कोणी सांगितले होते, सांगा म्हणजे आम्हाला कळू शकेल, किंवा आधीच सांगा, मग आम्ही म्हणू, ‘त्याचे म्हणणे न्यायी होते?’ कोणीही हे सांगितले नाही, कोणीही हे भविष्य केले नाही, कोणी तुमच्याकडून आलेला एकही शब्द ऐकला नाही.
२७
मीच सीयोनला सर्वप्रथम हे सांगितले, ‘हे पाहा, ते आले आहेत!’ मीच यरुशलेमकडे शुभ संदेश सांगणारा एक निरोप्या पाठविला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options