यशायाह ४१:१-७
१
“हे बेटांनो, तुम्ही माझ्यासमोर शांत राहा! राष्ट्रांना त्यांच्या सामर्थ्याचे नूतनीकरण करू द्या! त्यांना पुढे येऊन बोलू द्या; न्यायनिवाड्यासाठी आपण एकत्र भेटू या.
२
“पूर्वेकडून कोणी एकाला चिथविले, नीतिमत्वात त्यांची सेवा करण्यासाठी त्याला बोलाविले? राष्ट्रांना ते त्याच्या स्वाधीन करतात आणि राजांना त्याच्या अधीन करतात. ते त्याच्या तलवारीने त्यांची धूळधाण करतात, त्याच्या धनुष्याने वार्याने उडणारा भुसा करतात.
३
तो त्यांचा पाठलाग करतो व काहीही इजा न होता, आणि आधी प्रवास न केलेल्या वाटेने सुरक्षित पुढे निघून जातो.
४
पुरातन काळापासून पिढ्यांना कोणी पाचारण केले व हे घडवून आणले? मी, याहवेह—मी आदि आहे, मी अंत आहे—तो मीच आहे.”
५
बेटांनी हे बघितले व ते भयभीत झाले; पृथ्वीचा दिगंतापासून थरकाप झाला. त्यांनी प्रवेश केला व ते पुढे आले;
६
ते एकमेकास साहाय्य करू लागले व त्यांच्या सहकार्यास म्हणाले “धैर्यवान हो!”
७
धातू कारागीर सोनाराला प्रोत्साहित करतो, आणि हातोडीने धातू गुळगुळीत करणारा, ऐरणीवर घण मारणार्यास उत्तेजन देतो. धातू जोडणीबद्दल तो म्हणतो, “हे चांगले आहे.” मग दुसरा, ती मूर्ती कलंडू नये म्हणून त्यास खिळे ठोकतो.
Settings