Skip to content
यशायाह ३३:२०-२४

यशायाह ३३:२०-२४

२०
आमच्या सणांचे शहर, सीयोनाकडे पहा; तुमची दृष्टी यरुशलेम पाहतील, शांत असलेले निवासस्थान, हालविल्या न जाणारा तंबू; त्याच्या खुंट्या कधीही उपटल्या जाणार नाहीत, किंवा त्याच्या कोणत्याही दोऱ्या तोडल्या जाणार नाहीत.
२१
आमचे प्रतापी याहवेह तिथे असतील. विस्तीर्ण नद्या आणि प्रवाह असलेले ते ठिकाण असेल. कोणत्याही लहान जहाजाचे वल्हे त्यांच्यावर स्वार होणार नाही, कोणतेही प्रचंड जहाज त्यांच्यावरून जाणार नाही.
२२
कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत, याहवेह आम्हाला कायदा प्रदान करणारे आहेत, याहवेह आमचे राजा आहेत; तेच आम्हाला वाचविणार आहेत.
२३
तुमच्या जहाजांना आधार देण्याऱ्या दोऱ्या सैल सोडलेल्या आहेत: जहाजाची शीडकाठी सुरक्षित धरलेली नाही, जहाजाचे शीड पसरलेले नाही. तेव्हा लूट केलेल्या विपुल मालाची वाटणी केली जाईल आणि लंगडेसुद्धा लूट घेऊन जातील.
२४
सीयोनमध्ये राहणारा कोणीही असे म्हणणार नाही, “मी आजारी आहे;” आणि तिथे जे राहणारे आहेत, त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options