Skip to content
यशायाह ३:१६-२६

यशायाह ३:१६-२६

१६
याहवेह म्हणतात, “सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत, त्या मान उडवीत चालतात, चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात, पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत, कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात.
१७
म्हणून प्रभू सीयोनी स्त्रियांच्या डोक्यांना खवडे आणणार; याहवेह त्यांचे टाळू टकले करणार.”
१८
त्या दिवशी त्यांची सर्व आभूषणे प्रभू ओरबाडून काढतील: त्यांच्या बांगड्या, ललाटपट्टी, व चंद्रकोर हार,
१९
त्यांचे कानातील झुमके, कांकण आणि मुखावरण,
२०
त्यांची शिरोवेष्टणे, त्यांचे पैंजण आणि कमरपट्टे, अत्तरदाण्या आणि ताईत,
२१
अंगठ्या आणि नथण्या,
२२
उत्तम पोशाख, अधोवस्त्रे, अंगरखे, आणि बटवे,
२३
त्यांचे आरसे, त्यांची मलमलची वस्त्रे, मुकुट व शाली.
२४
सुगंधाऐवजी त्यांच्याकडे दुर्गंध येईल; कमरपट्ट्याऐवजी एक दोरी असेल; नीट केशरचनेऐवजी टक्कल; उत्तम पोशाखाऐवजी गोणपाट; आणि सौंदर्याऐवजी व्रण त्यांच्या वाट्याला येतील.
२५
तुमचे पुरुष तलवारीने पडतील, तुमचे योद्धे युद्धभूमीवर ढासाळतील,
२६
सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील; ती निराधार होऊन जमिनीवर बसलेली असेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options