Skip to content
यशायाह २९:९-१२

आध्यात्मिक अंधत्व आणि गुंगी

यशायाह २९:९-१२
सुन्न व्हा आणि आश्चर्याने थक्क व्हा, तुम्ही स्वतःला अंध करा आणि दृष्टीहीन व्हा. झिंगलेले व्हा, परंतु मद्याने नव्हे, लटपटणारे व्हा, परंतु मद्याने नव्हे.
१०
याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे: त्यांनी संदेष्टे, म्हणजे तुमचे डोळे बंद केले आहेत; त्यांनी दृष्टान्त पाहणारे, म्हणजे तुमच्या डोक्यावर आच्छादन घातले आहे.
११
तुमच्यासाठी हा संपूर्ण दृष्टान्त फक्त चर्मपत्राच्या गुंडाळीत मोहोरबंद केलेल्या शब्दांव्यतिरिक्त काहीच नाही, आणि जर तुम्ही वाचन करू शकणार्‍या एखाद्याला ही गुंडाळी द्याल आणि असे म्हणाल, “कृपया, हे वाचून दाखवा” ते उत्तर देतील, “मी हे करू शकत नाही; ते मोहोरबंद केलेले आहे.”
१२
किंवा ज्याला वाचता येत नाही अशा कोणाला तुम्ही ही गुंडाळी दिली आणि म्हणाले, “कृपया हे वाचा,” ते उत्तर देतील, “मला कसे वाचायचे ते माहीत नाही.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options