यशायाह २४:१-९
१
पाहा, याहवेह पृथ्वीचा नाश करणार आहेत आणि ती उद्ध्वस्त करणार आहेत; ते तिचा चेहरा बिघडवून टाकतील आणि तेथील रहिवाशांची पांगापांग करतील—
२
ते प्रत्येकासाठी समान असेल, जसे लोकांसाठी तसेच याजकासाठी जसे सेवकासाठी तसेच त्याच्या मालकासाठी जसे सेविकेसाठी तसेच तिच्या मालकिणीसाठी, जसे खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच विकत घेणाऱ्यांसाठी, जसे उसने देणाऱ्यासाठी तसेच उसने घेणाऱ्यासाठी, जसे कर्जदारांसाठी तसेच कर्जदात्यांसाठी.
३
पृथ्वी पूर्णपणे पडीक जमीन होईल आणि संपूर्णपणे लुटली जाईल. हे शब्द याहवेह बोलले आहेत.
४
पृथ्वी सुकते आणि कोमेजून जाते, जग खंगून जाते आणि सुकून जाते, आकाश पृथ्वीबरोबर झुरत राहते.
५
पृथ्वीला तिच्या लोकांनी भ्रष्ट केले आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, कायदे भंग केले आहेत आणि अनंतकाळाचा करार मोडला आहे!
६
म्हणून शाप पृथ्वीला भस्मसात करतो. तिच्या लोकांना त्यांच्या दोषाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पृथ्वीचे रहिवासी जळून गेले आहेत, आणि फारच थोडे उरले आहेत.
७
नवा द्राक्षारस सुकतो आणि द्राक्षवेल कोमेजून जाते. आनंद करणारे सर्वजण विव्हळतात.
८
आनंददायक ढोलकी शांत झाली आहे, हर्षोल्हास करणार्यांचा आवाज थांबला आहे, आनंद करणारी वीणा शांत आहे.
९
गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो!
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings