Skip to content
यशायाह २:१०-२२

यशायाह २:१०-२२

१०
याहवेहच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास कड्याकपारीत जा, जमिनीत लपून बसा!
११
उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.
१२
गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—
१३
लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू आणि बाशान येथील एलावृक्ष,
१४
उंच उंच पर्वत आणि सर्व उंच डोंगर,
१५
प्रत्येक भव्य बुरूज, प्रत्येक तटबंदीची भिंत,
१६
तार्शीशमधील प्रत्येक व्यापारी गलबत आणि बंदरातील डौलदार जहाजे, त्या दिवशी सर्व नष्ट होतील.
१७
मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल आणि मनुष्याचा गर्व खाली करण्यात येईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.
१८
सर्व मूर्तीचा समूळ उच्छेद होईल.
१९
जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील आणि जमिनीतील खाचात लपतील.
२०
त्या दिवशी लोक उपासना करण्यासाठी त्यांनी घडविलेल्या त्यांच्या चांदी व सोन्याच्या मूर्ती चिचुंद्र्या आणि वटवाघळे यांच्यापुढे फेकून देतील.
२१
जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील.
२२
मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे. त्यांना इतका बहुमान का द्यावा?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options