यशायाह १३:३-५
३
ज्यांना मी युद्धासाठी सुसज्ज केले आहे, त्यांना मी आज्ञा दिली आहे. जे माझ्या विजयाचा आनंद करीत आहेत— मी माझा क्रोध अंमलात आणण्यासाठी त्या माझ्या योद्ध्यांना पाचारण केले आहे.
४
ऐका, डोंगरावरील एक आवाज, मोठ्या लोकसमुदायासारखा आवाज! ऐका, राज्यांमध्ये चालू असलेला गोंधळ, राष्ट्रे एकत्र जमत असल्यासारखा आवाज! सर्वसमर्थ याहवेह, युद्धासाठी सैन्य जमा करीत आहेत.
५
ते फार दूर देशातून येतात, आकाशाच्या शेवटच्या टोकापासून— याहवेह आणि त्यांच्या क्रोधाची शस्त्रे संपूर्ण देशाचा नाश करण्यासाठी येतात.
Settings