यशायाह १०:२८-३२
२८
ते अयाथमध्ये प्रवेश करतात; ते मिग्रोनमधून पुढे जातात; ते मिकमाश येथे पुरवठा साठवितात.
२९
ते पुढे पलीकडे जातात आणि म्हणतात, “आम्ही गेबा येथे रात्रभर छावणी टाकू.” रामाह थरथर कापतो; शौलाचा गिबियाह पळून जातो.
३०
गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा! ऐक, लईशाह! गरीब बिचारा अनाथोथ!
३१
मदमेनाह पळून गेला आहे; गेबीमचे लोक आश्रय घेत आहेत.
३२
आज ते नोब येथे थांबतील; सीयोन कन्येच्या डोंगराकडे, यरुशलेमच्या टेकडीकडे ते त्यांच्या मुठी वळवतील.
Settings