Skip to content
होशेय १०:१२-१५

पश्चात्ताप आणि नीतिमत्त्वाचे आवाहन

होशेय १०:१२-१५
१२
तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.
१३
पण तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली आहे आणि अन्यायाचे पीक काढले आहे, तुम्ही लबाडीचे फळ खाल्ले आहे. कारण तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर आणि आपल्या अनेक योद्धांवर विश्वास ठेवला आहे,
१४
तुझ्या लोकांच्या विरुद्ध युद्धाची गर्जना होईल, जेणेकरून तुझ्या सर्व गडांचा नाश होईल; जसे शलमनाने युद्धाच्या दिवशी बेथ-आर्बेलाचा नाश केला, जेव्हा मातेला तिच्या मुलांसहित आपटून ठार मारण्यात आले.
१५
तसेच बेथेल तुझ्यासोबत होईल, कारण तुझी दुष्टता फार अधिक आहे. तेव्हा त्या दिवशी सकाळच्या प्रहरी इस्राएलाच्या राजाचा पूर्णरीतीने नाश केला जाईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options