मुख्य मजकुरावर जा
इब्री ९:२४-२८

ख्रिस्ताचे एकदाच आणि सर्वकाळासाठी अर्पण केलेले बलिदान

इब्री ९:२४-२८
२४
ख्रिस्ताने मानवी हाताने बांधलेल्या पवित्र मंदिरात प्रवेश केला नाही कारण ते खर्‍या मंदिराची केवळ नक्कल होती; आपल्यावतीने परमेश्वराच्या समक्षतेत उपस्थित राहण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष स्वर्गात प्रवेश केला आहे.
२५
आणि जसा महायाजक प्रतिवर्षी जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्यांना स्वर्गात जाऊन वारंवार स्वतःचे रक्त अर्पण करावयाचे नव्हते.
२६
तसे करणे आवश्यक असते, तर त्यांना जगाच्या स्थापनेपासून अनेकदा दुःख सहन करावे लागले असते. पण आता ते एकदाच युगाच्या समाप्तीस स्वयज्ञ करून प्रकट झाले आणि त्यांनी पापाची सत्ता नष्ट केली.
२७
जसे माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्यायाला तोंड देणे हे नेमून ठेवले आहे,
२८
तसेच अनेकांचे पाप वाहून नेण्यासाठी बली म्हणून ख्रिस्त एकदाच मरण पावले आणि ते दुसर्‍या वेळेस प्रकट होणार, ते पाप वाहण्यासाठी नाही, तर जे त्यांची धीराने वाट पाहतात, त्यांचे तारण आणण्यासाठी येतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options