ഉള്ളടക്കത്തിലേക്ക് പോകുക
इब्री ७:१-१२

इब्री ७:१-१२

हा मलकीसदेक शालेमचा राजा असून परात्पर परमेश्वराचा याजकही होता. अनेक राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना, मलकीसदेक त्याला भेटला व त्याला आशीर्वाद दिला.
तेव्हा अब्राहामाने सर्वांचा दहावा भाग त्याला दिला. प्रथम मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ, “नीतिमत्वाचा राजा” असा आहे; आणि, “शालेमचा राजा” म्हणजे “शांतीचा राजा” असा आहे.
त्याची आई किंवा वडील, वंशावळी, जीवनाचा उगम अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट याविषयी काही माहिती नाही, तरी परमेश्वराच्या पुत्रासमान तो युगानुयुग याजक राहतो.
तर तो केवढा थोर आहे याचा विचार करा: कुलपिता अब्राहामाने लुटीचा दहावा हिस्सा त्याला दिला.
लेवीच्या गोत्रातील, ज्यांना याजकपण प्राप्त होत असते त्यांना लोकांपासून, म्हणजे जे अब्राहामाच्या वंशजाचे आहेत अशा इस्राएली बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दहावा भाग गोळा करता येतो.
परंतु हा मनुष्य लेवी वंशातील नव्हता, त्याने अब्राहामापासून दशांश गोळा केला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला.
हे निर्विवाद सत्य आहे की मोठ्यांकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो.
या एका संदर्भात, याजक जे मर्त्य मानव आहेत, त्यांच्याद्वारे दशांश गोळा केल्या जातो, परंतु दुसर्‍या संदर्भात, तो जिवंत आहे असे त्याच्याविषयी जाहीर केले आहे.
दशांश गोळा करणार्‍या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल.
१०
कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला, तेव्हा लेवी पूर्वजाच्या शरीरात होता.
११
जर लेवी याजकपणाच्या संबंधात लोकांना खरोखर नियमशास्त्र प्राप्त झाले होते व त्यामुळे पूर्णता प्राप्त झाली असती, याजकपण स्थिर करता आले असते तर दुसर्‍या याजकाची गरज का होती, की जो मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आणि अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे नसावा?
१२
जेव्हा याजकपण बदलले, तेव्हा नियमात सुद्धा बदल होणे आवश्यक आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options