Skip to content
इब्री ४:७-११

इब्री ४:७-११

परंतु विसाव्यात प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने दुसरी वेळ नेमली आहे आणि त्याला “आज” असे म्हटले. हे ते फार पूर्वी दावीदाच्या मुखाद्वारे बोलले होते, आधीच नमूद केलेल्या शब्दांत ते म्हणाले, “आज तुम्ही त्यांची वाणी ऐकाल तर किती बरे, आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
जर यहोशुआने त्यांना विसावा दिला असता, तर परमेश्वराने यानंतर दुसर्‍या दिवसाविषयी बोलले नसते.
तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.
१०
जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे.
११
यास्तव, त्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करू या. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणामुळे कोणाचाही नाश होऊ नये.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options