इब्री ३:२-५
२
कारण जसा मोशे परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता, तसेच येशूही ज्यांनी त्यांना नेमले त्यांच्याशी विश्वासू होते.
३
कारण ज्याप्रमाणे एखाद्या घर बांधणार्याला, घराला लाभणार्या मानापेक्षा अधिक मान प्राप्त होतो, त्याचप्रमाणे येशू हे मोशेच्या सन्मानापेक्षा अधिक सन्मानास पात्र ठरले आहेत.
४
कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु सर्वकाही बांधणारे परमेश्वर आहे.
५
जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.”
Settings