Skip to content
इब्री ३:१-६

इब्री ३:१-६

यास्तव, पवित्र बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जे स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहात, ते तुम्ही आपले विचार येशूंवर केंद्रित करा, त्यांना आम्ही आमचा प्रेषित आणि महायाजक म्हणून कबूल करतो.
कारण जसा मोशे परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता, तसेच येशूही ज्यांनी त्यांना नेमले त्यांच्याशी विश्वासू होते.
कारण ज्याप्रमाणे एखाद्या घर बांधणार्‍याला, घराला लाभणार्‍या मानापेक्षा अधिक मान प्राप्त होतो, त्याचप्रमाणे येशू हे मोशेच्या सन्मानापेक्षा अधिक सन्मानास पात्र ठरले आहेत.
कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु सर्वकाही बांधणारे परमेश्वर आहे.
जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.”
परंतु विश्वासू पुत्र म्हणून परमेश्वराच्या घरावर ख्रिस्ताची नेमणूक झाली होती. जर आपण खरोखर आपला विश्वास आणि गौरवाची आशा शेवटपर्यंत टिकवून ठेवली तर आपण त्यांचे घर आहोत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options