मुख्य मजकुरावर जा
इब्री १३:१-६

ख्रिस्ती जीवनातील व्यवहार्य कर्तव्ये

इब्री १३:१-६
बंधुप्रीतिमध्ये जडून राहा.
अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे.
तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा, जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्‍यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा.
विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरूण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्‍यांचा न्याय परमेश्वर स्वतः करेल.
द्रव्यलोभापासून दूर राहा; जवळ असेल तेवढ्यात तुम्ही समाधानी असावे. कारण परमेश्वराने म्हटले आहे, “मी तुला कधीच सोडणार नाही व तुला कधीच टाकणार नाही.”
म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते: “प्रभू माझे सहायक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही. नश्वर मानव मला काय करणार?”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options