Skip to content
इब्री ११:२३-३१

इब्री ११:२३-३१

२३
विश्वासाद्वारे मोशेच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनीही त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण आपला पुत्र असामान्य आहे, हे पाहिल्यावर त्यांना राजाज्ञेचे भय वाटले नाही.
२४
मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले,
२५
व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले.
२६
इजिप्त देशामधील सर्व भांडाराचा मालक होण्यापेक्षा, ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे अधिक चांगले, असे त्याने मानले, कारण परमेश्वराकडून मिळणार्‍या महान प्रतिफळाची तो वाट पाहत होता.
२७
विश्वासाद्वारे त्याने इजिप्त देश सोडला व राजाच्या क्रोधाला तो घाबरला नाही. मोशेने धीर धरला, कारण त्याने जे अदृश्य आहेत त्या परमेश्वराला पाहिले.
२८
म्हणूनच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्यांनी वल्हांडण सण विश्वासाद्वारे साजरा केला आणि कोकराचे रक्त लावले, यासाठी की मृत्युदूताने इस्राएली लोकांच्या ज्येष्ठ मुलांना स्पर्श न करता निघून जावे.
२९
विश्वासाद्वारे इस्राएली लोक तांबड्या समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्‍या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सर्व बुडून मेले.
३०
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोकांनी विश्वासाने यरीहो शहराच्या तटबंदीभोवती सात दिवस चालत फेर्‍या घातल्यावर, ती तटबंदी खाली कोसळली.
३१
विश्वासाद्वारे राहाब वेश्येने इस्राएली हेरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला व त्यामुळे परमेश्वराची आज्ञा न पाळणार्‍या लोकांबरोबर तिचा अंत झाला नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options