हबक्कूक २:१-५
१
मी पहारा देण्यासाठी उभा राहीन आणि टेहळणीच्या बुरुजावर चढेन; मी बघेन व ते मला काय उत्तर देतात हे पाहेन आणि या तक्रारीला मी काय उत्तर द्यावे ते पाहेन.
२
तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “हे प्रगटीकरण लिही आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही म्हणजे घोषणा करणारा धावतांनाही वाचू शकेल.
३
कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते; ते अंत समयाबद्धल बोलते आणि ते खोटे ठरत नाही. जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा; ते निश्चितच येईल आणि त्याला उशीर होणार नाही.
४
“बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे; त्याच्या इच्छा दुष्ट आहेत— पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल.
५
खरोखर, मद्य त्यांचा घात करते; तो उन्मत्त आहे व त्याला कधीही चैन पडत नाही. कारण तो कबरेसारखा लोभी आहे आणि मृत्यूप्रमाणे तो कधीही समाधानी होत नाही, तो अनेक राष्ट्रे गोळा करीत आहे, आणि सर्व लोकांना बंदिवान करीत आहे.
Settings