- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
योसेफ मिसरचा कारभार पाहतो
उत्पत्ती ४१:४६-५७
४६
योसेफाने फारोह राजाच्या सेवेत प्रवेश केला, तेव्हा तो तीस वर्षाचा होता. नंतर राजधानी सोडून तो इजिप्त देशभर प्रवास करू लागला.
४७
पुढील समृद्धीच्या सात वर्षात देशात चहूकडे भरघोस पीक आले.
४८
या समृद्धीच्या सात वर्षांच्या काळात योसेफाने इजिप्तमध्ये प्रत्येक शहराच्या भोवताली असलेल्या शेतात जे अन्नधान्य पिकले ते सर्व त्याने त्या भागाच्या जवळ असलेल्या शहरात साठवून ठेवले.
४९
योसेफाने समुद्राच्या वाळूप्रमाणे धान्याचा मोठा साठा केला; ते इतके होते की त्याने नोंदी ठेवणे बंद केले, कारण ते मोजण्यापलीकडे होते.
५०
याकाळात, दुष्काळाची वर्षे येण्यापूर्वी योसेफाला ओन येथील याजक पोटीफेराची कन्या आसनथ हिच्या पोटी दोन पुत्र झाले.
५१
योसेफाने त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव मनश्शेह असे ठेवले आणि तो म्हणाला, परमेश्वराने माझ्या सर्व यातना आणि आपल्या वडिलांच्या घराला मुकण्याचे दुःख, यांचा विसर पाडला आहे.
५२
त्याच्या दुसर्या पुत्राचे नाव एफ्राईम असे ठेवले आले. कारण योसेफ म्हणाला, “परमेश्वराने माझ्या यातनेच्या या देशामध्ये मला फलद्रूप केले आहे.”
५३
इजिप्त देशातील समृद्धीची सात वर्षे संपत आली.
५४
मग योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली. इजिप्त देशाच्या सभोवती असलेल्या सर्व देशांमध्ये सुद्धा दुष्काळ पडला; परंतु इजिप्तमध्ये अन्न होते.
५५
इजिप्ती लोकांची उपासमार होऊ लागली, तेव्हा लोक फारोहजवळ अन्न मागू लागले आणि फारोहने त्यांना योसेफाकडे पाठविले व त्यांना सांगितले, “योसेफ सांगेल त्याप्रमाणे करा.”
५६
तेव्हा आता सर्व देशभर दुष्काळ पसरला असताना योसेफाने धान्याची कोठारे उघडली आणि तो इजिप्त देशाच्या लोकांना धान्य विकू लागला, कारण इजिप्तचा दुष्काळ अत्यंत भयानक होता.
५७
जगभर दुष्काळ पडल्यामुळे संपूर्ण जगातील लोक इजिप्तमध्ये येऊन योसेफाकडून धान्य विकत घेऊ लागले.
Settings