Skip to content
उत्पत्ती ३८:१२

उत्पत्ती ३८:१२

आजूबाजूच्या संदर्भासह वचन १२ दाखवत आहे.
९
ओनानला हे ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून ज्यावेळी तो तिच्याशी समागम करी, त्यावेळी तो आपले वीर्य जमिनीवर पाडी, यासाठी की त्याच्यापासून भावाला संतती होऊ नये.
१०
हे त्याचे कृत्य याहवेहच्या दृष्टीने एक फार मोठे पाप होते; म्हणून याहवेहने त्यालाही मारून टाकले.
११
यहूदाह आपली सून तामारला म्हणाला, “माझा पुत्र शेलाहचे विवाहाचे वय होईपर्यंत तू तुझ्या वडिलांच्या घरात विधवा म्हणून राहा.” यहूदाहला भीती वाटत होती की हा मुलगाही आपल्या भावांप्रमाणे मरेल. मग तामार तिच्या वडिलांच्या घरी गेली.
१२
कालांतराने यहूदाहची पत्नी जी शूवाची मुलगी होती ती मरण पावली. शोक करण्याचे दिवस संपल्यावर यहूदाह, आपला मित्र अदुल्लाम येथील हीरा, याच्याबरोबर आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्‍यांकडे तिम्ना येथे गेला.
१३
“तुझा सासरा तिम्ना येथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी गेला आहे,” असे कोणीतरी तामारेला सांगितले.
१४
तिने आपले वैधव्यदशेत वापरण्याचे कपडे बाजूला ठेवून दिले आणि आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तिने अंगावर बुरखा घेतला. मग तिम्नाच्या वाटेवर असलेल्या एनाईम गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ती जाऊन बसली. कारण तिने पाहिले की, शेलाह आता मोठा झाला असला तरी तिला त्याची पत्नी म्हणून दिले गेले नाही.
१५
तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options