उत्पत्ती ३६:१४-१९
१४
एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला, यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले.
१५
एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज,
१६
कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते.
१७
एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.
१८
एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून: यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. हे पुढारी एसावाला, अनाह याची कन्या ओहोलीबामाह हिच्यापासून झाले.
१९
हे एसावाचे (अर्थात् एदोमाचे) पुत्र, जे त्यांच्या कुळाचे पुढारी होते.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings